चालत्या बस मधून प्रवाशाचे दीड लाखाचे दागिने लंपास : एस टी बस थेट आटपाडी पोलिसात : प्रवाशांची कसून तपासणी
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : प्रतिनिधी : चालत्या बस मधून अज्ञात चोरट्याने तब्बल अंदाजे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना नांदेड-पलूस एस टी बस मध्ये घडली असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात बस प्रवाशा सह आणण्यात आली असून या ठिकाणी बस मधील सर्व प्रवासी यांची कसून तपासणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, पंढरपूर बस स्थानक येथून पलूस आगाराची नांदेड पलूस बस निघाली होती. यावेळी बस मध्ये पंढरपूर येथून नीता महेश बावकर ह्या प्रवाशी आटपाडी कडे जाण्यासाठी निघाले होते. महुद जवळीक पळशी फाट्या नजिक बस आली असता, प्रवाशी नीता बावकर यांना त्यांच्या पर्स मधील अंदाजे दीड लाख रुपयांचे दागिने व सात हजार रुपये रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बस थेट आटपाडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आली.
यावेळी सर्व प्रवाशी यांची तपासणी करण्यात आली.परंतु कोणत्याही प्रवाशाकडे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली नाही.सदर घटनेची आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.