माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथील बाजारपेठ जवळील स्मशानभूमीच्या आवारात झाडेझुडपे वाढले असून आजूबाजूला कचरा विखुरला आहे त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून याकडे आटपाडी नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.
स्मशानभूमीत प्रवेश करताना बाजूला पाण्याची टाकी असून त्याची चावी लिकेज असल्याने पाणी वाहत असून रस्ता चिखलमय झाला आहे. अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांना इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या टाकीत पाणी असूनही वाहते पाणी समस्या कायम आहे. स्मशानभूमीला तारेच्या जाळीच्या कंपाउंड असून साफसफाई होत नसल्याने गैरसोय होते. शहरातील विविध सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च होत असले तरी, स्मशानभूमीकडे नगरपंचायत केव्हा लक्ष देणार असा सवाल आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला आहे,
स्मशानभूमीत जाणारे व्यक्ती दुःखात असतात या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम राबवावी, नगरपंचायतीने लक्ष द्यावे असे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.