Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य: August 25, 2023 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस…, काय सांगते तुमची राशी…

0 809

मेष: एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. असे असले तरीही बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अन्यथा काही वाद होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास होईल. शक्यतो नवीन कार्यारंभ आज करू नये. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

 


वृषभ: आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्याच संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल.


मिथुन: घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल.


कर्क: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. शक्यतो प्रवास व नवीन कार्याचा आरंभ टाळावा.


सिंह: उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


कन्या: आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल.


तूळ: महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.


वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा – समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.


धनु: एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. शांतता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील.


मकर: आजचा दिवस लाभदायी आहे. सगे – सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल – प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.


कुंभ: व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान – सन्मान प्राप्त होतील. मित्र व कुटुंबीयांसह आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होतील.


मीन: शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. प्रवास यशस्वी होतील. व्यापारी बंधूंना व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.