माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथे सायकलला अडकवलेली दोन लाख रुपयांची पैशाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी केली. सदरची घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तुकाराम सदाशिव देशमुख (वय ७८) रा. विठ्ठलनगर हे आज दुपारी १२ च्या बँक ऑफ इंडिया या बँकेतून दोन लाख रुपये काढून ते सायकल वरून निघाले होते. सदरचे पैसे हे घराच्या बांधकाम करणेकरिता मुलांना देणेसाठी ते निघाले असता, मार्केट यार्ड जवळ आले असता, त्यांच्या सायकलच्या चाकामध्ये काहीतरी अडकले असल्याने खाली उतरून ते काढण्यासाठी उतरले असता, सायकलला अडकवलेली पैशाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत तुकाराम सदाशिव देशमुख यांनी, आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सदर घटनेचा तपास पोलीस करत आहे.