एस.टी. वाहन-चालकाच्या प्रसंगावधाने वाचला प्रवाशांचा जीव ; ब्रेक फेल होवूनही…
माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड/प्रतिनिधी : वाई आगारातील वाई-लातूर एस.टी.बस.आज म्हसवड मार्गे जात असताना, धुळदेव ता. माण येथे ब्रेक फेल झाले. परंतु एस.टी. वाहन चालकाच्या प्रसंगावधाने वाचले अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी वाई आगारातून म्हसवड-पंढरपूर मार्गे लातुर जात असलेली एम.एच.१४ बि.टी. ३०९७ एस.टी.बस म्हसवड येथून लातूरकडे जात असताना धुळदेव नजीक दुपारी १२ वाजून ३० च्या दरम्यान बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधाने बस थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु साधारण दोन किलोमीटर अंतरावर जाऊन झाडाझुडपात बस घालून चालकाने धाडसाने प्रवाशांचे प्राण वाचवले.
यावेळी बोलताना चालक म्हणाले, बस चा ब्रेक फेल झाल्यावर समोरुन येणारी दोन वाहने वाचवण्यात यश आल्याने सर्व प्रवाशांनाही वाचविण्यात यश मिळाले. यावेळी प्रवाशी व ग्रामस्थांनी एस.टी.वाहन- चालकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. याच ठिकाणी या मार्गावरील दीड ते दोन किलोमीटर अंतरावर. रस्त्याची खूपच बिकट अवस्था झाली आहे. या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण करून घ्यावे.अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.