शिंदे-फडणवीस-पवार मंत्रीमंडळातील “या” मंत्र्याने तोडले अकलेचे तारे : म्हणाले, ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर झाले..!
माणदेश एक्सप्रेस न्युज : धुळे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणी बघितलं तर लगेच पटवून घेणार. त्वचाही चांगली दिसू लागते.
विजयकुमार गावित म्हणाले, “ऐश्वर्या राय बंगळुरच्या समुद्रकिनारी शहरात राहायची. ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खाल्ले तर तुमचेही डोळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यांसारखे सुंदर होतील, त्वचाही सुधारेल. मासे खाल्ल्यावर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस.. माणूस म्हणजे बाईमाणूस चिकने दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घ्या. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना… ती दररोज मासे खायची, म्हणून तिचे डोळे सुंदर झाले. माश्यांमध्ये ऑईल असतं. माशाचे तेल डोळे आणि परिणाम होतो. त्यामुळे स्कीन चांगली राहते, असंही ते म्हणाले.