Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य: आज दिनांक २१ ऑगस्ट २०२३ : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी…

0 690


मेष: घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधानकारक असेल. सामाजिक पत – प्रतिष्ठा वाढेल. मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. वस्त्रालंकार लाभतील.

 


वृषभ: अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल


मिथुन: संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. मित्रांचा सहवास घडल्याने आपणास आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल.


कर्क: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपारनंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.


सिंह: सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपारनंतर आप्तेष्टांकडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. प्रेमळपणामुळे स्वभाव मृदु होईल.


कन्या: आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.


तूळ: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट – कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल.


वृश्चिक: आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी वाद संभवतो. स्वभावात तापटपणा वाढेल.


धनु: कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार – व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल.


मकर: परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल.


कुंभ: वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल.


मीन: दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील.

(टीप : फक्त माहिती पोहचविणे हाच उद्देश, यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही.)

Leave A Reply

Your email address will not be published.