माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : कौठूळी गावाचे सुपुत्र अण्णासो कदम यांचे निधन सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान आज दि १९ रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास निधन झाले.
अण्णासो कदम हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले येथे आरोग्य सेवक म्हणून सेवा बजावत होते. आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. परंतु आज दिनांक १९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 20 रोजी सकाळी ९.०० वाजता कौठूळी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.