माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यातील महिलांसाठी प्रथमच आटपाडी शहरामध्ये जवळे ज्वेलर्स अॅण्ड सन्स च्या वतीने “नागपंचमी महोत्सव” आयोजित करण्यात आला असून यामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना जवळे ज्वेलर्स अॅण्ड सन्स च्या वतीने हमखास भेटवस्तू व गिफ्ट मिळणार आहे.
आटपाडी शहरामध्ये जवळे ज्वेलर्स अॅण्ड सन्स च्या वतीने “नागपंचमी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. खेळात सहभाग घेणाऱ्यास पाच पैठणी, पाच चांदीचे छल्ले, पाच ठुशी व १ ग्रॅमची नथ देण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम हा जवळे मल्टीपर्पज हॉल, आटपाडी येथे रविवार दिनांक 20 रोजी दुपारी ४.०० वा. आयोजित करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी स्वाती बालटे निवेदिका असणार असून या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जवळे ज्वेलर्स अॅण्ड सन्स च्या वतीने करण्यात आले आहे.