Latest Marathi News

BREAKING NEWS

 

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला ; मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

0 945

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे. सदरची घटनाही मुंबईतल्या मालवणी भागात घडली आहे. सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरने दोनदा हॉर्न वाजवला. त्याचा राग मनात धरुन चार मुलांनी बांबू आणि पट्ट्याने मारहाण केली. ही मुलं झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होती. त्यामुळे सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. याचा राग मनात धरुन त्याला मारहाण करण्यात आली. सद्दाम मंडल असं सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरचं नाव आहे.

 


१३ ऑगस्टच्या रात्री सद्दामला मारहाण करण्यात आली. सई ताम्हणकरला त्याने चिंचोली बंदर या ठिकाणी सोडलं. तिला सोडून परतत असताना ही घटना घडली. सद्दाम त्याच्या घरी परतत होता.


या प्रकरणी सद्दाम म्हणाला की, मी गाडी चालवत होतो. त्यावेळी काही जण झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होते. त्यांचा अपघातही होऊ शकत होता इतक्या वेगात ते होते. मी हॉर्न वाजवला आणि गाडी नीट चालवा असंही सुचवलं. त्यानंतर या मुलांनी त्यांच्या बाईक थांबवला आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मुलांनी त्यांच्या मित्रांनाही त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि मला मारहाण केली. त्यानंतर ते तिथून पळून गेले. मालवणीतल्या काही स्थानिकांनी मला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मी या प्रकरणा पोलिसात तक्रार दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.