Latest Marathi News

BREAKING NEWS

 

कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे स्कूल बस अपघात प्रकरणी बस चालक, संस्था अध्यक्ष, सचिव विरुद्ध गुन्हा दाखल

0 477


माणदेश एक्सप्रेस न्युज : तासगाव : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात ६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी हा अपघात घडला असून या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बस चालकासह शिक्षण संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


आनंद सागर या शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच १२ एफसी ९११३) नरसिंगाव येथे पलटी झाली. या अपघातामध्ये विभावरी पोतदार, विकास पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी सगरे, समृद्धी माळी, अनन्या पवार हे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कवठेमहांकाळमधील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी बस चालक तुषार माळी याच्यासह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.