माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुधवारी पहाटे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे ते ऐतवडे बुद्रुक मार्गावरील देवर्डी गावच्या एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय तीन वर्षाचे आहे. आज पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी अवस्थेत बिबट्या रस्त्याकडेला पडला होता. याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला तात्काळ दिली. मात्र, वन कर्मचारी येईपर्यंत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच बघ्याची घटनास्थळी गर्दी झाली होती. ऐतवडे, कुरळप, परिसरात उस शेती मोठ्या प्रमाणात असून उसाच्या फडालाच बिबट्याने आपले आश्रय स्थान केले आहे. यामुळे वारंवार बिबट्याचे दर्शन घडत आहे. ऐतवडे ग्रामसभेनेही बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा असा ठराव मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत केला आहे.