आटपाडीत शिक्षकाचे घर फोडून ८.५ लाखांची चोरी : चोरीने पंचायत समिती परिसरात खळबळ
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी शहरातील पंचायत समिती पाठीमागील भागवत नगर येथील प्रविण भास्कर भांबुरे (वय ४१) या शिक्षकाचे घर पहाटे फोडून अज्ञात चोरट्यानी १२.५ तोळे सोने, मोबाईल आणि १ लाख १२ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ८.५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रविण भांबुरे आणि कुटुंबिय रात्री जेवण करून झोपले होते. पहाटे स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. प्रविण भांबुरे यांच्या खोलीत प्रवेश करून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले.
प्रविण यांच्या खोलीला कडी घालुन सासू आणि आई झोपलेल्या खोलीत चोरांनी प्रवेश केला. या खोलीतील एका पर्समधून मोबाईल आणि पैसे तसेच खोलीतील दागिने घेतले.यावेळी प्रविण यांच्या आईला जाग येताच त्यांनी आरडा ओरडा केल्यावर चोर घराला कडी लावून पळून गेले.
या घटनेत सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, अंगठी, रिंग ,झुबे असे १२.५ तोळ्यांचे दागिने, मोबाईल आणि १ लाख १२ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ८.५ लाखांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. पंचायत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.