Latest Marathi News

BREAKING NEWS

 

खरसुंडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

0 863

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून निधी

 

मानदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी / मनोज कांबळे : आमदार अनिलभाऊ बाबर व संचालक सांगली जिल्हा बँक तानाजीराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून खरसुंडी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन सोहळा पार पडला. सरपंच धोंडीराम इंगवले, उपसरपंच राजक्का कटरे, माजी सरपंच चंद्रकांत पुजारी, माजी उपसरपंच अर्जुन सावकार, जगनाथ कोळपे, दिलीप सवणे, प्रमुख उपस्थित होते.
आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्थानिक निधीतून महादेव मंदिर ते सिद्धनाथ मंदिर येथे बंदिस्त पेविंग ब्लॉक व बंदिस्त गटार, जानकर वस्ती येथे स्मशानभूमी बांधणे, नवीन वसाहतीमध्ये बंदिस्त गटार व पेविंग ब्लॉक बसवणे आदी विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी ग्रा.पं.सदस्य सुभाष माळी, किरण पुजारी मनीषा बनसोडे, शारदा पुजारी, जनाबाई केंगार, विक्रम भिसे, राहुल गुरव, निलेश पोमधरणे, ग्रामसेवक पवन राऊत, विजयकुमार भांगे, जितेंद्र पाटील, नितीन पुजारी, खरसुंडी वि.का सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी, व्हा.चेअरमन आनंदा पुजारी, नानाभाऊ पुजारी, बबन सानप, नामदेव जानकर, देवबा जानकर, सुखदेव जानकर, विश्वास गुरव, विनायक सगरे, मोहन शिंदे, विनोद पुजारी, मंगेश पुजारी, रोहित भांगे, अवधूत देशपांडे, विकास पुजारी, हरिदास पुजारी, सचिन गुरव, विकी शेख, ऋषिकेश पुजारी यांच्यासह जानकरवस्ती-खरसुंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.