Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२३: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी.

0 169

मेष- अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात वरचढ राहाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखादी व्यक्ती तुम्हाला गोड बोलून कामे करुन घेण्याचा प्रयत्न करेल.

 


वृषभ- वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुणाचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. महत्त्वाच्या कामासाठी खूप दगदग होईल.


मिथुन- एखाद्याउलाढालीत सतत कार्यरत राहावे लागेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. काही विचित्र लोकांशी संपर्क येईल.व्यवसायात भरभराट होईल. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. आर्थिक व्यवहार जपून करा.


कर्क- नवनवीन कामे समोर येतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. जवळच्या लोकांच्या वागण्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील.


सिंह- लोकांच्या सहवासात मन रमेल. नोकरीत बरीच कामे करावी लागतील पण सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. त्यामुळे कामे पटापट पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवण आवश्यक आहे.


कन्या – पाय मागे खेचणाऱ्या लोकांना टाळणेच योग्य राहील. त्यापेक्षा जे लोक नेहमी मदत करतात अशा लोकांच्या भेटीगाठी घ्या. फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका, काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.


तूळ – मात्र त्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागतील. जवळच्या लोकांची चांगली साथ राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. अडचणी दूर होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.


वृश्चिक- महत्त्वाच्या कामात विलंब होईल. काही अडचणी येतील. मात्र, आपण आत्मविश्वासाने वाटचाल सुरु ठेवाल, फार दगदग होईल, अशी कामे करू नका. जीवनसाथीची चांगली साथ राहील.


धनु- तुमच्या हातून चांगली कामे होतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील, जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मुलांना चांगल्या संधी मिळतील. काहींना अचानक प्रवास घडून येईल. शिक्षणात प्रगती होईल.


मकर- लोकांचा तुमच्याशी मधुर व्यवहार राहील. नवीन शिकण्याची मनात उमेद निर्माण होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. घरात किरकोळ वाद टाळा. सतत कार्यरत राहाल.


कुंभ- जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात सतर्क राहा. भावंडाशी किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. प्रसंगी आपणच माघार घ्यावी. कठोर शब्द वापरणे टाळा. नाही तर लोक दुखावले जातील.


मीन- चांगल्या बातम्या कानावर पडतील. कामात सफलता मिळेल. मात्र, त्यासाठी बरेच कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. घरात काही कारणाने वाद होऊ शकतात. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील.


टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती पोहचविणे उद्देश.

Leave A Reply

Your email address will not be published.