माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील मालतत्तेच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार दौलुशा रामा पवार, रा. सोमेश्वरनगर, आटपाडी, ता. आटपाडी, जि.सांगली याची दिवसें दिवस बळावत चाललेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या वर्तनास पायबंद घालणेकरीता त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे हद्पपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी विटा विभाग, विटा यांचेकडे पाठविण्यात आलेला होता.
सदर पाठविलेल्या प्रस्तावाचे अनुषंगाने सुनावणी होवून उपविभागीय दंडाधिकारी विटा विभाग, विटा यांनी आटपाडी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार दौलुशा रामा पवार यास सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्हयातून १ वर्षासाठी हद्दपार केले आहे. दौलुशा रामा पवार यास हद्दपार केलेबाबतच्या नोटीसची आज दि.०५.०८.२०२३ रोजी बजावणी करून त्यास उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर येथे सोडण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सांगली डॉ बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सपोफौ चव्हाण, पोहेकॉ उमर फकीर, पोकॉ प्रमोद रोडे यांनी केली आहे.