Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य दि. ०३ ऑगस्ट २०२३ : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी…

0 879

मेष – महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. कागदोपत्री नोंदी ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. आर्थिक देवाणघेवाण थोडी जपून करा. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

 


वृषभ- नवीन प्रयोग करून पाहिले जातील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. आर्थिक फायदे होतील. कामातील बदल दमछाक करणारे वाटतील; पण जुळवून घेतल्यास सगळे काही हळूहळू सुरळीत होईल.


मिथुन- मोठ्या सौद्यात फायदा होईल. भावंडाशी मधुर संबंध राहतील. त्यांच्यासमवेत मौजमजा कराल. जवळच्या सहलीला जाण्याचे योग येतील. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी दूर होतील.


कर्क- महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. वाहने जपून चालवा. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. मनासारखे मिष्टान्न भोजन मिळेल.


सिंह- नवनवीन कामे मिळतील. तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. जीवनसाथीची खंबीर साथ राहील. जनसंपर्कातून फायदे होतील.


कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मनात काळजीचे विचार राहतील. आरोग्याची काळजी घ्या. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला चांगली मदत करेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.


तूळ – किरकोळ स्वरुपाच्या अडचणी येतील मात्र, त्यातून आपण मार्ग काढाल. हाती घेतलेल्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.


वश्चिक- एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. काही कारणाने कुरबुरी होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सुख-सोयी वाढवून मिळतील.


धनू- मात्र, त्यातून तुमचा फायदा होईल. त्यामुळे काम करावे लागले तरी काही वाटणार नाही. जवळच्या प्रवासाचे योग येतील. प्रवासाचे नीट नियोजन करा. कलाकार मंडळींना चांगला काळ आहे.


मकर- मालमत्तेच्या कामात व्यस्त राहाल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मात्र, त्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील.


कुंभ- जनसंपर्क चांगला राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. भेटवस्तू मिळतील.


मीन- विविध प्रकारच्या पूर्तता करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. अनावश्यक खर्च होईल. काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात दगदग होईल. मुलांची काळजी वाटेल.
टीप : माणदेश एक्सप्रेस यातून कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती पोहचविणे उद्देश

Leave A Reply

Your email address will not be published.