दिव्यांग व्यक्तीच्या असह्यापणाचा फायदा घेत अनेक वेळा यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते. तर काही वेळा यांना मारहाण देखील करण्यात येते. अशाच मारहाणीचा प्रकार सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून पाणी मागितल्याचा कारणावरून उत्तर प्रदेशमध्ये प्रांतिया रक्षक दलाच्या ( पीआरडी ) जवानांनी दिव्यांग व्यक्तीला धमकी देत मारहाण केली आहे.
उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात शनिवारी ( २९ जुलै ) ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. सचिन सिंह असं दिव्यांग व्यक्तीचं नाव आहे. तर, राजेंद्र मणी आणि अभिषेक सिंह असं दोन पीआरडी जवानांची नावे आहेत. ही घटना समोर आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत रेल्वे अपघातात सचिनला पाय गमवावे लागले आहेत. सचिन सिम कार्ड विक्री आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. या घटनेबद्दल बोलताना सचिनने सांगितलं की, “शनिवारी रात्री उशिरा जेवन करून घरी परतत होतो. तेव्हा रस्त्यात एक कासव दिसले. ते कासव दुग्धेश्वरनाथ मंदिराजवळील तलावात नेऊन सोडले.”
“तळ्यावरून परत येत असताना दोन पीआरडी जवान दिसले. कासव हातात घेतल्यामुळे वास येत होता. म्हणून मी त्यांच्याकडे पाणी मागितलं. पण, पीआरडी जवानांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देत मारहाण केली. त्यांनी माझ्या ट्रायसायकलची चावीही हिसकावून घेतली,” असं सचिनने म्हटलं.
पाणी मागितल्याने दिव्यांग व्यक्तीला मारहाण करणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.