माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी पोलीस ठाणे येथे सन १९९० साली दाखल असलेल्या गुन्हातील परागंदा असलेल्या आरोपी तब्बल ३३ वर्षांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी शंकर वासुदेव देशपांडे (सध्या मयत) रा. कौठूळी यांनी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलीस ठाणे येथे सन ११९० साली आरोपी भारत सुबराव काळे रा. करगणी या आरोपी विरुद्ध चोरीची तक्रार दिली होती.
आरोपी भारत सुबराव काळे हा गुन्हा दाखल असलेपासून परागंदा होता. आटपाडी पोलीस ठाणे कडील पो.काँ प्रमोद रोडे यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपी हा सांगोला तालुक्यातील धायटी येथे वास्तव्यास असलेची माहिती मिळाली होती.
पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पो.हे.कॉ उमर फकीर,पो.हे.कॉ शंकर पाटील, पो.ना नितीन मोरे, पो.कॉ. प्रमोद रोडे, पो.कॉ. महेश काळे, पो.कॉ. अमोल पाटील यांनी धायटी ता. सांगोला येथे जावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले असून आरोपी कडून गुन्हयामधील चोरीस गेलेला माल एकुण १०६ ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड तसेच चांदीचे दागिने असा मुद्देमाल ताब्यात मिळण्यास मदत होणार आहे.