मेष- मनात आनंदी विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. जवळच्या लोकांशी सुसंवाद राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येईल.
मिथुन- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भागीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप पाठीवर पडेल. प्रेमात सफलता प्राप्त होईल. आवडते लोक भेटतील.
सिंह- चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांची प्रगती होईल. त्यांना योग्य संधी मिळेल. स्पर्धा परीक्षा देणायांना चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नावलौकिक वाढेल.
तूळ – व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. हाती पैसा खेळता राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. फार मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळीचा सल्ला घ्या. भेटवस्तू मिळतील.
धनु- तुमच्यासमोरील अनेक अडचणी दूर होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांच्या प्रशंसेस पात्र ठराल. मुलांचे कौतुक होईल.
कुंभ- आरामात कामे होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल, विविध प्रकारचे लाभ होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आशावादी दृष्टीकोन राहील.
वृषभ- थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहील. जीवनसाथीचा सहयोग राहील. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो.
कर्क- तब्येतीची काळजी घ्या. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. नाही तर लोक तुमच्या कामात अडथळा आणतील. सकारात्मक विचार करा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.
कन्या- कामाचे स्वरूप बदलेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुण्या रावळ्यांची वर्दळ राहील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामे मार्गी लागतील.
वश्चिक- खाण्या-पिण्याची चंगळ राहील हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीची चांगली साथ राहील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल.
मकर- थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात आध्यात्मिक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत परिश्रम करावे लागतील. जीवनसाथीची काळजी घ्या. फार चांगल्या संधी मिळतील. दगदग करू नका.
मीन- तुमच्या कामाचे स्वरूप बदलेल. नवीन शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मुलांना चांगल्या संधी मिळतील.
टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही. फक्त माहिती पोहचविणे