माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : दुचाकी चोरून ते स्वस्तात विक्री करणाऱ्या दोघा चोरट्यांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली. दोघांकडून 6 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या असल्याची अशी माहिती मिरज शहरचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
रणजीत श्रीरंग लोखंडे (वय 25 रा. मल्हारवाडी, मंगसुळी, जि. बेळगाव) आणि संजू आण्णाप्पा वालेकर (वय 26 रा. सावळज,ता.तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे प्रकटीकरणाचे पथक गस्त घालत असताना म्हैसाळ रस्त्यावर चोरीची दुचाकी विक्रीसाठी चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला.
त्यावेळी त्यांच्या एककडे एक दुचाकी मिळून आली. पथकाने मोटारसाकलबाबत चौकशी केली असता मिरजेतून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असल्याने त्यांनी विविध ठिकाणाहून 13 दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच त्या दुचाकी स्वस्तात विक्री केल्याची देखील कबुली दिली.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, निलेश कदम, पृथ्वीराज कांबळे, सचिन सनदी, गजानन बिरादार, लक्ष्मण कोजलगी, रणजीत जाधव, दिपक परिट, दत्तात्रय फडतरे, श्रीकांत केंगार आदींच्या पथकाने हौ कारवाई केली.