Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“या” कामगार नेत्याच्या हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता

0 304

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणातून गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश एएम पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी राजनला या हायप्रोफाईल हत्याप्रकरणाच्या सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.

 


फिर्यादीनुसार, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपरच्या पंतनगरकडे जीपने जात असताना पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात सामंत यांचा मृत्यू झाला होता.


विशेष सीबीआय न्यायाधीश एएम पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी राजनला हत्येसंदर्भातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. फिर्यादीनुसार, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपरच्या पंतनगरकडे जीपने जात असताना पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात सामंत यांचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.