Latest Marathi News

BREAKING NEWS

 

राधानगरी धरण ७७ % भरले ; पुर परिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना

0 139

माणदेश एक्सप्रेस न्युज : राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने धरण ७७ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरून पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

 

आज शनिवारी (दि. २२) सकाळी संपलेल्या चोवीस तासात ९० मिमी इतका पाऊस झाला. तर दिवसभरात ८२ मिमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर १७९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६४२७.६६ द.ल.घ.फु. इतका पाणी साठा असून पाणी पातळी ३३६.५४ इतकी झाली आहे. खासगी वीजनिर्मितीसाठी धरणातून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून सध्याची पुर परिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

जून महिना कोरडाच गेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी, पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. पावसाच्या विलंबामुळे राधानगरी धरणाने तळ गाठला असताना पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ८.३६१ टी.एम.सी.पाणी साठा क्षमतेच्या राधानगरी धरणात आजअखेर ६.१५ टी.एम.सी इतका झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.