Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची बदली

0 1,333

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी ; आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झाली नाही. पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा पदभार आटपाडीचे सुपुत्र व विटा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

 

आटपाडी तालुका पंचायत समितीमध्ये मनोज भोसले यांनी तीन वर्ष काम केले. कोरोनाच्या काळात नागरिकांना अधिक सुविधा व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनजागृतीचे काम प्रभावीपणे केले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे कामे त्यांनी सुरु करून अनेकांच्या हाताला काम दिले.

 

महिला बचत गट सक्षमीकरण, घरकुल योजना, जलजीवन योजना, दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी त्यांनी केली. तसेच तालुक्यात लोकसहभाग मधून सुरु असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या “मॉडेल स्कूल” शाळांसाठी मोठे प्रयत्न केले. तालुक्यात एक कार्यक्षम अधिकारी अशी प्रतिमा निर्माण केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.