माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती झाली आहे. सोमवार २४ रोजी त्या पदभार स्वीकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली. त्यामुळे निखिल ओसवाल यांच्याकडे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
सीईओ पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र तृप्ती धोडमिसे यांची वर्णी लागली आहे. याबाबत आदेश अपर मुख्य सचिव यांनी शुक्रवारी काढले.
सोलापूर जिल्ह्यातील धोडमिसे या २०१९ च्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या धुळे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे.