माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी ही आटपाडी शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे कामास आहे. फिर्यादी हिला आरोपी सुनिल मोहन शिंदे रा. जुना कराड नाका पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर याने याने फिर्यादीस तुला जर तुझ्या घरच्याना खुष बघायचे असेल, तुझ्या बहीण सुखात बघायचे असेल तर ,फिर्यादीस मी म्हणेस तसे वागावे लागेल अशी धमकी दिली.
तसेच इच्छा नसतानाही फिर्यादीस फोन वर बोलायला भाग पाडले व फिर्यादीने आरोपीचा फोन उचलायचा बंद केल्यावर आरोपीने फिर्यादीचे घरासमोर येवून फिर्यादीचे हाताला धरून फिर्यादीस मिठ्ठी मारण्याच प्रयत्न करून फिर्यादीचे मनास लाज वाटेल असे कृत्य केले आहे. तसेच फिर्यादीस दाखवतोच अशी धमकी दिली.