Latest Marathi News

BREAKING NEWS

 

व्हिडीओ : आटपाडी आंबेडकरनगर मधील गटर बांधकाम निकृष्ट दर्जाचे : जागरूक नागरिकांनी काम रोखले

0 1,402

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये नगरपंचायतीच्या सुरु असलेले आंबेडकरनगर ते ऐवळे गल्ली सुरु असलेले गटर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने येथील जागरूक नागरिक व आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे सनी कदम, रोहित चंदनशिवे, महेश मोटे, सौरभ ऐवळे, राहुल खरात, राहुल मोटे, योगेश मोटे, सतीश जावीर, विनोद मोटे, नितीन मोटे शत्रुघन खरात यांनी या ठिकाणी धाव घेत सदरचे काम रोखले.

 

याबाबत आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. आटपाडी शहरामध्ये नगरपंचायतीच्या सुरु असलेले आंबेडकरनगर ते ऐवळे गल्ली गटर बांधकाम सुरु आहे. परंतु ठेकेदाराने या ठिकाणी आहे त्या गटारी झाकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंदाजपत्रकानुसार या ठिकाणी काम होत नसल्याचे सनी कदम यांनी उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. अंदाजपत्रकामध्ये सहा इंच स्लॅब जाळी असताना प्रत्यक्षात मात्र १३ इंचावर जाळी मारली जात आहे.

त्यामुळे सदर ठिकाणी अंदाजपत्रकानुसार काम न झाल्यास दिनांक २६ जुलै रोजी आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.