Latest Marathi News

BREAKING NEWS

 

कुकुडवाड नजीक स्त्री जातीचे अर्भक टाकणारे कोण? : परिसरामध्ये खळबळ

0 944

माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड : अहमद मुल्ला : माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मायणी म्हसवड रस्त्यालगत कुंभार मळा येथे पाच दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी बुधवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी सहाचे सुमारास कुंभारमळा येथे म्हसवड कडून मायणी कडे जाणारा एक दुचाकी स्वार लघुशंकेसाठी थांबला असता त्याला डण्याचा आवाज येत आला. यावेळी त्याने सदरचा प्रकार हा कुकुडवाडच्या पोलिस पाटील व काही ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली.

पोलिस पाटील व ग्रामस्थ यांनी ते अर्भक ताब्यात घेतले असता, अर्भकाला मुंगळ्यांनी चावा घेतल्याने कान , तोंड व शरीरावर इजा झाली होती. उमेश लक्ष्मण काटकर यांनी १०८ व पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर स्थानिक डॉक्टरांच्या कडे उपचार करून ते अर्भक म्हसवड पोलीस व आरोग्य खाते यांच्या ताब्यात देण्यात आले.

म्हसवड पोलीस व आरोग्य खात्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात सुरक्षितपणे पाठवण्यात आले आहे. मात्र हे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने कुकुडवाड परिसरात संताप व्यक्त होत असून अर्भक टाकणारे कोण? याचा तपास पोलीस व आरोग्य खात्याने करावा व दोषांच्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस डी पी खाडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.