Latest Marathi News

BREAKING NEWS

 

इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती ; पाच जणांचा मृत्यू

0 1,021

माणदेश एक्सप्रेस न्युज : रायगड : खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्यांशी असलेलेल्या इर्शाळवाडीवरदरड कोसळली आहे. यात अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 

एनडीआरएफचे जवान नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. काल (बुधवारी) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहचले आहेत. या घटनेबाबत अधिक माहितीसाठी ८१० ८१९ ५५५४ या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले.

आतापर्यंत 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मंत्री उदय सामंत, दादा भूसे, अनिल पाटील याठिकाणी पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

काल रात्री अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून सर्वत्र चिखल झाला आहे. चिखल तुडवून गावापर्यंत बचावकार्यासाठी जावे लागत आहेत. रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. ४० ते ५० कुटुंब येथे राहत होते. अडीशे जण येथे राहत असल्याची माहिती आहे. पंचवीस जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. शंभरहून अधिक जण अद्याप आहेत. या वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.