Latest Marathi News

BREAKING NEWS

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0 190

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली, दि. 19 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील 12 पोटजातीतील अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील व्यक्तींची आर्थिक उन्नती होण्यासाठी थेटकर्ज योजना राबविण्यात येत आहे.

 

या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी एकूण 50 लाभार्थीचे 50 लाख रूपयांचे उदिष्ट प्राप्त झाले असून दि. 25 जुलै 2023 पर्यंत लाभार्थीने प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथे दाखल करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.