Latest Marathi News

BREAKING NEWS

 

भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी “यांची” नियुक्ती : जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पृथ्वीराज देशमुख यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता?

0 1,028

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर केली आहे. यामध्ये सांगली च्या जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची नियुक्ती केली आहे.

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करत इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. निशिकांत भोसले-पाटील यांच्या माध्यमातून भाजपने नवीन चेहऱ्याला संधी दिली असून त्यांच्यापुढे जिल्ह्यातील आव्हान असले तरी, खुद्द मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांचे मोठे आव्हान आहे.

 

जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये सध्या दिग्गज नेते मंडळी आहेत. यामध्ये खासदार संजयकाका पाटील व तत्कालीन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तसेच खासदार संजयकाका पाटील व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातील वाद यातून मार्ग काढून त्यांना सोबत घेऊन पक्षाची वाटचाल करणे, मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

माजी आमदार असलेले पृथ्वीराज देशमुख हे भाजप कडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पण, त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांना मर्यादा येत असल्याने जिल्हाध्यक्ष बदलण्याचा हा निर्णय पृथ्वीराज देशमुख यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हात मजबूत आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, व जिल्हातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या साथीने पक्ष संघटना पुढे नेवून आगामी येणाऱ्या सर्वंच निवडणुकांमध्ये भाजप हा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष करण्याचे आव्हान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या समोर आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.