Latest Marathi News

BREAKING NEWS

 

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधारेचे; “या” भागात पावसाचा ‘जोर’ वाढणार

0 653

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच वेग पकडला असून, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत कोसळणाऱ्या मुसळधारांनी बळीराजाला दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील जलधारांची मुसंडी आता आणखी वाढणार असून, पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुढील ५ दिवसांसाठी कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी पालघर आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे. पुढील २ दिवस मध्य भारताच्या काही भागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस होईल. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात पाऊस थोडा जास्त असेल. मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.

१९ जुलै : रेड अलर्ट
पालघर, रायगड, पुणे, सातारा
२० जुलै : ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
२० जुलै : ऑरेंज अलर्ट
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
पुणे, सातारा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा
२१ जुलै : ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.