Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडीत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : हाऊसफुल गर्दीचा दुसरा आठवडा चालू

0 1,321

दै. माणदेश एक्सप्रेस : आटपाडी : सचिन कारंडे : आटपाडी येथील सिद्धनाथ चित्रमंदिर येथे दि. ७ जुलै 2023 रोजी पासून सुरु असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा दुसरा आठवडा हाऊसफुल गर्दी सुरू आहे.

 

सिद्धनाथ चित्रमंदिर मध्ये दररोज १२ ,३ व ९ हे तीनही खेळ धूमधडाक्यात हाऊसफुल गर्दीत सुरू आहेत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला ची गर्दी चित्रपट पाहण्यास होत आहे.

सिद्धनाथ चित्रमंदिर येथे मल्टिप्लेक्स थिएटर प्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अत्याधुनिक पद्धतीचे साऊंड सिस्टिम, बसण्यासाठी कोचिंग आसन, उत्कृष्ट प्रकारची स्वच्छता ठेवण्यात आली आहे. चित्रपटाचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. ऑनलाइन ॲडव्हान्स बुकिंग चालू असून तिकीट खिडकीवर सुद्धा तिकिटे उपलब्ध आहे.

तरी आटपाडी तालुक्यातील सर्व चित्रपट प्रेक्षक रसिकांनी आवर्जून थिएटर मध्ये येऊन चित्रपट पाहावा असे आवाहन सिद्धनाथ चित्र मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.