Latest Marathi News

BREAKING NEWS

 

केरळ च्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे निधन

0 240

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोची : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन झाले. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के सुधाकरण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती माहिती दिली. तसेच, वरिष्ठ काँग्रेस नेते चांडी यांच्या निधनाने अतिव दुख झाल्याचेही त्यांनी म्हटले.

 

ओमान चांडी यांची प्रकृती गेल्या ४ वर्षांपासून खालावलेली होती. सन २०१९ साली त्यांच्या गळ्यासंबंधित आजार वाढल्याने त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले होते. मात्र, आज मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

ओमान चांडी हे दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सन १९७० साली त्यांनी विधानसभेला पुथुपल्ली मतदारसंघातून निवडून लढवत आमदारकी मिळवली होती. काँग्रेस नेते के. सुधाकरण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देताना, अतिव दु:ख झाल्यचे म्हटलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.