Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२३: नोकरीत बढती मिळणार ; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

0 856

मेष- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.

 

वृषभ- अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल.

मिथुन- सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल.

कर्क- आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल.

सिंह- आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल.

कन्या- मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल.

तूळ- आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल.

वृश्चिक- लेखन – साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे.

धनु- खाण्या – पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे.

मकर- व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ- सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील.

मीन- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.