आटपाडीत श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटीचा उद्या लोकार्पण सोहळा : चेअरमन दिपक बंदरे यांची माहिती : शुभारंभ ठेवीवर मिळणार आकर्षक व्याजदर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडीत येथे श्री विठ्ठल मल्टीस्टेज को-ऑफ क्रेडीट सोसायटीचे उद्या दिनांक १३ रोजी भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती सोसायटीचे निमंत्रक दिपक बंदरे यांनी दिली.
‘साथ आमची, प्रगती तुमची’ असे बीद्र वाक्य घेवून श्री विठ्ठल मल्टीस्टेज को-ऑफ क्रेडीट सोसायटीची स्थापना दिपक बंदरे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेवून केली. आटपाडी येथील ओमसाई निवास, वीज बोर्डासमोर दिघंची रोड, आटपाडी येथे उद्या दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. या क्रेडीट सोसायटीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
लोकार्पण सोहळ्या निमित्त शुभारंभ ठेवीवर वार्षिक १२ % व्याजदर ठेवीदारांना देण्यात येणार असून या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन दिपक बंदरे यांनी केले आहे.