माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले तसेच आर्थिक सुबत्ती आणणारा तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू असून कारखान्याचा भोंगा पाच वर्षांनी प्रथमच वाजल्याने शेतकऱ्यांच्या वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
माणगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी देशमुख गटाने अनपेक्षितपणे माघारी घेतल्याने, साखर कारखाना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या ताब्यात गेला. कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने तानाजीराव पाटील गटाने पुढाकार घेतला असून, साखर कारखान्याकडे आज पर्यंत पावणे सहा लाख टन ऊसाची नोंद झाली आहे. तर 488 वाहनांशी तोडणी करार झाला असून 188 वाहनांना उचल देण्यात आली आहे.
कारखाना सुरू होणार असल्याने नुकताच सर्व संचालक मंडळ व तानाजीराव पाटील यांना कामगारांनी सत्कार केला.