उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. हिमाचलमधील कुल्लू, मंडी, शिमला आणि चंबा परिसरात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाट रस्त्यावरही दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
निसर्गाने रौद्ररुप धारण केल्याने हिमाचलमध्ये डोंगरकड्यांवरून मोठमोठे दगड रस्त्यावर पडत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. सनवारा येथील काल्का-शिमला राष्ट्रीय महामार्गावरही दरड कोसळ्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे.
डोंगर माथ्यावरून मोठी दरड कोसळत असताना दोन-तीन गाड्या काही सेकंदाच्या आत रस्त्यावरून पुढे गेल्या. नाहीतर या गाड्यांवर दरडीचे दगड कोसळून मोठा अपघात झाला असता. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नाही, असंच काहीसं घडलं असल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा