Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धावत्या ट्रेनमध्ये तरुणाने केलं संतापजनक कृत्य; व्हिडीओव पहा…

0 207

ट्रेनमधून प्रवास करताना दरवाजापासून दूर राहा ही सूचना कायम दिली जाते. चालत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणारे अनेक टवाळखोर तुम्ही पाहिले असतील. या टवाळखोरांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

 

कधी बाहेरुन रेल्वेमध्ये दगड मारल्याच्या घटना घडतात तर कधी प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तींच्या डोक्यात हे टवाळखोर मारतानाचे व्हिडीओ यापूर्वी पाहायला मिळाले.
मात्र सध्या व्हायरल होत असलेला आणि चर्चेत आलेला व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. एक तरुण ट्रेनमधून बाहेर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तींना बेल्टने मारत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालत्या ट्रेनच्या दारात एक तरुण उभा आहे. तरुण रेल्वेच्या दारात उभा राहून बाहेर प्लॅटफॉर्म वरील लोकांना बेल्टने मारत आहे. खूपच धक्कादायक दृश्य व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. ट्रेनमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. भितीमुळे कुणीही त्याला थांबवण्याचाही प्रयत्न करत नसल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.