Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे पुराच्या पाण्यात नेली बस; खिडकीतून उड्या मारुन प्रवाशांनी आपला वाचवला जीव; व्हिडीओ पहा…

0 965

डेहराडून : देशात मानसूनची सुरुवात झाली असून, उत्तर भारतात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमध्येही पाऊस लोकांसाठी खूप त्रासदायक ठरला आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे, याचा वाहनांना फटका बसत आहे. अशात डेहराडूनच्या शिमला बायपासवर पाण्याच्या प्रवाहात बस अडकल्याची घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल रोडवेजची चंदीगडहून हरिद्वारला जाणारी बस पूराच्या पाण्यात अडकली. यादरम्यान काही प्रवाशांनी खिडकीतून उडी मारुन तर काहींनी बसच्या छतावर चढून आपला जीव वाचवला. हे दृष्य इतके धक्कादायक होते की, थोडीही चूक झाली असती, तर प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता.

 

नदीचे पाणी पुलावरुन वाहत असूनही चालकाने गाडी घातल्याने ही घटना घडली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. डेहराडूनमधील शिमला बायपास चौकाजवळ ही घटना घडली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.