माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सांगली येथील विश्वशांती देवांग फौंडेशनच्या वतीने आटपाडी येथील चौंडेश्वरी सहकारी पतसंस्थेचे नुतन चेअरमन राहुल सपाटे यांचा मोगऱ्याचं रोप देऊन सत्कार करण्यात आला.
विश्वशांती देवांग फौंडेशन सामाजिक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते तसेच गरजू रुग्णांना गरजू व आर्थिक दुर्बल रुग्णांना अर्थसहाय्य करते. विविध सामाजिक उपक्रम राबवत, सामाजिक पाटलावर काम करणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान देखील करते. दहावी बारावीतील मेरिट मधील विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देऊन त्यांना शालेय साहित्य देण्याचे काम ही संस्था करते.
कार्यक्रमास विश्वशांती देवांग फौंडेसन सांगली संस्थेचे विश्वस्त नारायण उंटवाले सर, सुभाष कवडे सर, शंकर वैद्य गुरुजी तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.