Latest Marathi News

BREAKING NEWS

 

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती सह दोघांवर गुन्हा

0 900

माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड : मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून पानवण, ता. माण येथील मोना उर्फ आकांक्षा संदीप लोखंडे (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी पती सह दोघांवर म्हसवड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 

पती संदिप रघुनाथ लोखंडे, सासरा रघुनाथ सुखदेव लोखंडे, सासु उषा रघुनाथ लोखंडे सर्व रा.पाणवन ता.माण जि.सातारा अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहे.

जाचाला व मानसिक त्रासाला कंटाळुन मोना उर्फ आकांक्षा संदिप लोखंडे वय 22 वर्षे हिने (दि. ४ ) रोजी संध्या ६. च्या दरम्यान तिचे सासरी राहते घरी गळफास लावुन घेवुन आत्महत्या केली.

तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती संदीप रघुनाथ लोखंडे, सासरा रघुनाथ सुखदेव लोखंडे व सासू उषा (तिघे रा. पानवण) यांच्या विरोधात आकांक्षाचे वडील अविनाश राजेंद्र कसबे (वय ४५, रा. सुस्ते, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो ह. कुऱ्हाडे अधिक तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.