महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नसला तरी इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक सर्वत्र या चित्रपटातील एक गाण्याची चांगलीच हवा होती.
‘बहराला हा मधुमास’ या गाण्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. या गाण्याची हुक स्टेप प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.
अगदी वेगवेगळ्या वयातील, वेगळ्या देशातील, ज्यांना कदाचित मराठी भाषा समजतही नसावी त्यांनी सुद्धा या गाण्यावर भन्नाट रील्स बनवल्या होत्या. अशीच एक नवी रील सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.
पण इतर सर्व रील्सपेक्षा या व्हिडिओची क्रिएटिव्हिटी वेगळ्याच स्तरावर भन्नाट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गाणं आणि अर्थ तोच असला तरी या सुंदर तरुणींनी बहरला हा मधुमास गाणं चक्क संस्कृत भाषेत सादर केलं आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे.