Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बायकोला खर्चाला दिलेल्या पैशाचा हिशोब मागणे नवऱ्याला पडले महागात; व्हिडीओ पहा…

0 1,554

सोशल मीडियावर नवरा बायकोच्या वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. यासाठी कधी नवऱ्याने दारु पिल्याचं निमित्त असतं तर कधी आणखी काही, पण कधी नवऱ्याने आपल्याच पैशांचा हिशोब मागितला म्हणून त्याला बायकोने मारहाण केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का?

 

नसेल तर आता तेदेखील पाहायला मिळणार आहे. हो कारण उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका महिलेने तिच्या नवऱ्याने पैशाचा हिशोब मागितला म्हणून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

संतापलेल्या बायकोने नवऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या बहिणीच्या मदतीने नवऱ्याला दोरीने बाधून काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बायकोने नवऱ्याचे दोन्ही हात धरल्याचं दिसत आहे. तर तिच्या बहीणी नवऱ्याला काठीने मारहाण करताना दिसत आहेत.

हे प्रकरण अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधापूर गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कानपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.