उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेनेच्या (UBT) उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. नीलम गोर्हे आज या प्रवेश सोहळ्यात शिंदे यांच्या शिवसेनेत औपचारिक प्रवेश करणार आहेत.
नीलम गोर्हे 1998 मध्ये शिवसेनेत दाखल झाल्या, तेव्हापासून त्या एक निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून ओळखल्या जातात. महिलांच्या समस्यांसह इतर सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणूनही त्या ओळखल्या जातात. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नीलम गोर्हे यांनी सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडली.
सुषमा अंधारे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने दीपाली सय्यद, मनीषा कायंदे आणि नीलम गोर्हे यांच्यासह अनेक ठाकरे गटाचे नेते नाराज असल्याचे सांगण्यात आले. सुषमा अंधारेंच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि एकाधिकारशाहीमुळे शिवसेना ठाकरे गटात अनेक महीला नेत्या नाराज आहेत. उद्धव ठाकरेंकडून त्यांना झुकते माप मिळत आहे. निलम गोऱ्हेंनी पक्ष सोडण्याचे हेच कारण आहे.
नीलम गोर्हे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आज सकाळपासून येत आहे. मात्र, कुणीही त्यांचे नाव थेट घेतले नाही. त्यांचा फोनही संपर्कात नव्हता. अखेर नीलम गोर्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे.
त्यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं होतं. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. त्या ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात. शिवसेनेची पुणे जिल्ह्याच्या त्या संपर्कप्रमुख होत्या. शिवसेनेतील महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत.
निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांनी 2005 मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं, 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम केलं.