Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी शेअर मार्केट फसवणूक प्रकरण : संतोष अडसूळवर अखेर गुन्हा दाखल

0 4,635

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुक केलेली रक्कलम ट्रेडींग करून १० महिन्यामध्ये दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक केल्या प्रकरणी तब्बल सात आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात भा.दं.वि.स.कलम. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

 

फिर्यादी रामजी चंद्रकांत होनमाने वय ३० वर्षे, व्यवसाय शेती, रा. मंगळवेढा जि सोलापुर सध्या रा. महात्मा फुले नगर, पीडब्लुडी ऑफिसचे मागे, आटपाडी ता आटपाडी यांनी आरोपी १) संतोष रामचंद्र आडसुळ २) राहूल अशोक चव्हाण ३) विनायक शंकर माळी ४) सुधीर रामचंद्र आडसुळ ५ ) निकिता संतोष आडसुळ ६) अनिल आनंदा अडसुळ ७) मल्हारी संजय आडसुळ संर्व रा. आटपाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी, रामजी चंद्रकांत होनमाने यांना आरोपींनी शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुक केलेली रक्कशम ट्रेडींग करून १० महिन्यामध्ये दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखविले. त्यातून फिर्यादी यांनी आरोपी यांचे निहारिका फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातुन फिर्यादी कडून एकुण ७७,५८,९०० रूपयांची गुंतवणुकं करून घेवून ती रक्ककम १० महिन्यात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादीस सुरूवातीस गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर १५,४०,०००/- रूपयाचा परतावा देवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर उर्वरित मुद्दल रक्क म ६२, १८,९०० व त्यावरील परतावा परत न देता फिर्यादीस तसेच फिर्यादी प्रमाणे १) संतोष सुभाष गुजले याची १८,९०,०००/- २) प्रविण बाळासो बनसोडे यांची ८,५०,६७०/- ३) यशवंत हरिदास मेटकरे यांची ५,००,०००/- रूपये अशी मिळून एकुण ९४,५९,५७० रूपयांची फसवणुक केली आहे. सदर गुन्ह्याबाबत सपोनि श्री. वाघ हे अधिक तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.