तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना : गजवेल मतदार संघात तणावाची परिस्थिती : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे मौन
माणदेश एक्सप्रेस न्युज : हैदराबाद : तेलंगणा येथील मुख्यमंत्री मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गजवेल मतदार संघामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून या या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गजवेल येथील संगापूर येथील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीने रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना येथील काही नागरिकांनी बघितली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजाने या ठिकाणी येथे ज्याने विटंबना केली आहे त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आणून त्याच्याकडून सदर जागा साफ करून त्या ठिकाणी माफी मागण्यात आली होती.
परंतु या ठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणत जमत फेरी काढण्याचा प्रयत्न जमावाने केला. परंतु पोलिसांनी तो हाणून पडला. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्याने या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सदर घटने बाबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अद्याप ही मौन बागळले आहे.