मेष: आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार – व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल.
वृषभ: आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल.
मिथुन: आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
कर्क: आज आपण मौज – मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल.
सिंह: आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल.
कन्या: आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.
तूळ: आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा.
वृश्चिक: आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील.
धनु: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका.
मकर: आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल.
कुंभ: आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे – घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा.
मीन: आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी – व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल.