माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज निरोप देण्यात आला.
यावेळी माहिती अधिकारी एकनाथ पोवार, जिल्हा माहिती कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, बन्सीलाल मांडवे, नागेश वरूडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.
यावेळी बोलताना वर्षा पाटोळे म्हणाल्या, सांगलीत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळाला. प्रसिद्धी विषयक काम करताना लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. सांगलीत पाच वर्षे काम करता आले याचा आनंद मोठा आहे. सांगलीत काम करत असताना सर्वच घटकांनी दिलेली साथ अविस्मरणीय असून सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, अशी भावना मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करताना केली.