माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जिल्हा माहिती अधिकारी सांगली या पदाचा कार्यभार आज संप्रदा बीडकर यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज निरोप देण्यात आला.
यावेळी माहिती अधिकारी एकनाथ पोवार, जिल्हा माहिती कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, बन्सीलाल मांडवे, नागेश वरूडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.
नूतन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी यापूर्वी सांगली येथे माहिती अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले आहे. त्यांनी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, कोल्हापूर तर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, सोलापूर येथे काम केले आहे. शासकीय सेवेपूर्वी श्रीमती बीडकर यांनी ई टी व्ही हैद्राबाद, लोकमत पुणे, तरुण भारत सांगली, युवा सकाळ कोल्हापूर येथेही विविध पदांवर कामकाज केले आहे.